पूर्वी कीर्तनकार आफळे वगैरे असायचे, आता फॉरवर्डकार आफळे असतात
तंत्रज्ञानामुळे या सर्वांना आपले शिष्य तयार करून परंपरा सहज चालवता येते व असंख्य फॉरवर्डकार आफळे मिळतात
तेंव्हा रामयणातल्या छोट्या प्रसंगावर तासभर कीर्तन चालायचे
आता भक्त, छोट्या प्रसंगावर वा घटनांवर पाच पाच पानी मेसेज फॉरवर्ड करतात
तेंव्हा एक सोंगाड्या विनोदी पात्र म्हणून असायचा
आता ती जबाबदारी काही तरुण राजकीय मंडळी सांभाळतात
तेंव्हा आयुर्वेद व पथ्ये फक्त वैद्यानाच माहिती होती
आता जपानपासून ते अमेरिकेपर्यंत सगळे आयुर्वेदाची महती सांगतात
तेंव्हा गरम पाण्यापासून ते दही भातापर्यंतचे पदार्थ हे खाण्यापिण्या करता होते
आता तुमचे आरोग्य ठीक राहायला या गोष्टींची औषधे होत चालली आहेत
तेंव्हा मी मुकाट गप्प असायचो
आता, मी पण मनोगत लिहून लोकांना बोअर करतो
